भारतीय महिलांच्या छोट्या स्टार्टअपसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार, गुगलची मोठी घोषणा

मुंबई,१९ डिसेंबर २०२२: भारतीय महिलांच्या छोट्या स्टार्टअपसाठी गुगल ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि बीपी संजय गुप्ता यांनी सोमवारी केली.

ते म्हणाले, आयडीएफ गुंतवणुकीच्या स्वरूपात महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच छोट्या कंपन्यांना देखील पाठिंबा दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • नवीन प्रकल्प

या कार्यक्रमात कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऑपरेट केल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये स्पीच टेक्नॉलॉजी, वाॅईज आणि व्हिडिओ सर्च इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच टेक्स्ट कंटेंट तातडीने व्हिडिओमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. इंग्रजीतून इतर कोणत्याही भाषेत भाषांतर सहजपणे शक्य होईल. एवढंच नाही तर कंपनीने भारतातील ७७३ जिल्ह्यातील स्पीच डेटा संकलित करण्यासाठी बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत सहयोगाची देखील घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे १ दशलक्ष डॉलर अनुदानाची घोषणा करत, गुगलने आयआयटी मद्रास येथे भारतातील पहिले ए आय केंद्र स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले.

कंपनीने इंटरनेट स्वस्त करण्यासाठी २०२० मध्ये १० बिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली होती. डिजिटायझेशन फंडच्या माध्यमातून कंपनीने जिओमध्ये ७.७३ टक्के भागीदारी (४.५ बिलियन डॉलर) आणि भारतीय एअरटेलमध्ये १.२ टक्के वाटा (७०० मिलियन डॉलर) खरेदी केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा