मुंबई, १३ ऑक्टोंबर २०२२ : भारतातील शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बायजू’ (Byju’s) येत्या सहा महिन्यात नोकरकपात करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत तोट्यात असलेल्या कंपनीला नफा कमवून देण्यासाठी जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे. मार्केटींग आणि कंपनीचा इतर खर्च कमी करण्यासाठी एकुण ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी पाच टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. ‘बायजू’च्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, मागील आर्थिक वर्षात बायजूला ४ हजार ५८८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती देखील दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. बायजूची संपूर्ण भारतात २०० हून अधिक सक्रिय केंद्रे कार्यरत आहेत. २०२२ च्या अखेरीस ते ५०० केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. आथिर्क वर्ष २०२१ मध्ये बायजूला ४ हजार ५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तेव्हापासून महसुलात मोठी घट झाल्याची माहितीही गोकुळनाथ यांनी दिली.
कंपनी नवीन भागीदारांद्वारे परदेशात ब्रँड जागरुकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय, भारत आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहिती
बायजू कंपनीच्या सह-संस्थापक दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. आम्ही संपूर्ण भारतात आमचा ब्रँड निर्माण केला आहे.
आत्ता मार्च २०२३ पर्यंत नफा कमावण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. आम्ही भारतभर ब्रँडबाबत जागरुकता निर्माण केली आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या भागीदारीतून ब्रँडबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल अशी माहिती गोकुलनाथ यांनी दिली आहे. ‘बायजू’च्या सहाय्यक कंपन्या ‘मेरीटनॅशन ट्युटरविस्टा स्कॉलर आणि हॅशलर्न या भारतातील व्यवसायाचाच भाग असतील. तर आकाश आणि ‘ग्रेट लर्निंग’ स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत राहतील, असे गोकुलनाथ यांनी सांगित
या नव्या योजनेमुळे कार्यक्षमता वाढेल आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल. त्यामुळे भूमिकांचेही सुसूत्रीकरण होईल. आमचे शैक्षणिक मॉडेल ‘बायजू क्लासेस’ आणि अॅप खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. यासाठी शिक्षक भरती करण्यात येईल. या योजनेमुळे महसुलाचे नियोजन करता येऊ शकते असे गोकुलनाथ यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे