शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, यापुढे इयत्ता ५ वी आणि ८ वी उत्तीर्ण होणे आवश्यक

पुणे २४ जून २०२३: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खूप मोठी बातमी आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, म्हणजेच पाचवी आणि आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच सहाव्या आणि नवव्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. या निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

पूर्वीच्या नियमांनुसार वार्षिक परीक्षा होत होत्या. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने आता या दोन्ही वर्गांच्या वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केलय. यासाठी २०११ च्या शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करून ५वी आणि ८ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे शिक्षण विभागाने अनिवार्य केले.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, आता संबंधित विद्यार्थ्यांची पाचवी आणि आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ५ वी आणि ८ वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना आणखी एक वर्ष, एकाच वर्गात शिकावे लागणार आहे. मात्र, पाचवीपर्यंत जुने नियम कायम राहणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा