दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झंझावात! AAPला मोठा धक्का, सत्ता धोक्यात?

9

दिल्ली ८ फेब्रुवारी २०२५: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये अप्रत्याशित राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपने विजयाची मोठी झेप घेतली आहे.

दिल्लीच्या ७० सदस्यीय विधानसभेत भाजपने ४५ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे, तर AAP केवळ २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकही जागा मिळण्याची चिन्हे नाहीत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर असून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडी घेत आहेत. कालकाजीमध्ये मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर असून भाजपचे रमेश बिधूडी आघाडीवर आहेत. मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज यांसारख्या AAP नेत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, ओखला, मुस्तफाबाद आणि बल्लीमारानसारख्या मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपने चांगली आघाडी मिळवली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात AAP पिछाडीवर असून भाजप स्पष्ट वर्चस्व मिळवताना दिसत आहे. आता सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा