नीरेत साई सेवा प्रतिष्ठान च्या वतीनं रक्तदान शिबिर… ५२ तरुणांनी केलं रक्तदान

पुरंदर, १३ डिसेंबर २०२०: नीरा येथे साई सेवा प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये निरा येथील ५२ तरुणांनी रक्तदान केलं. माजी सरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते आज सकाळी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. नीरेचे माजी उपसरपंच विजय शिंदे यांनी या शिबिराचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

राज्यामध्ये कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इतर आजाराच्या रूग्णांसाठी रक्त कमी पडत असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळंच निरा येथील माजी उपसरपंच विजय शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवारानं साई सेवा प्रतिष्ठानच्यावतीनं आज (दि.१३) रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी उपसरपंच विजय शिंदे यांनी येथील तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत निरा येथील ५२ तरुणांनी रक्तदान केलं.

सकाळी माजी सरपंच राजेश काकडे यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. यावेळी विराज काकडे, नाना जोशी, विजय शिंदे, मंगेश ढमाळ, टिके जगताप, दादा शिंदे, राहुल शिंदे बापू गायकवाड, कल्याण जेधे, चंद्रराव धायगुडे, आभी भालेराव, अनिकेत सोनवणे, राहुल कांबळे, शेखर शिंदे, अक्षय शिंदे, मंगेश आहिरे, संतोष पवार, भूषण जैन इत्यादी उपस्थित होते. या शिबिराला निरेतील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं.

क्रांतीसिंह नानापाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा व जिल्हा रुग्णालय रक्त पेढी सातारा यांच्या वतीनं यावेळी रक्त संकलित करण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा