राजस्थानच्या चंबळ नदीत ३० जणांसह बोट पलटली, ५ जणांचा मृत्यू

10

राजस्थान, १६ सप्टेंबर २०२०: राजस्थानातील बुंदी येथे चंबळ नदी ओलांडताना एक बोट पलटी झालीय. या बोटीत २५ ते ३० जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. बोट पलटी झाल्याची घटना इंदरगड पोलिस स्टेशन परिसरातील चांददा खुर्द इथं घडल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, ३० जणांनी भरलेली बोट गोथळा कला जवळ कमलेश्वर धामकडं जात होती. बोट मध्ये सुमारे एक डझन दुचाकीही ठेवण्यात आल्या. ही बोट नदीच्या मध्यभागी पोहोचताच ती अचानक उलटली. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासनाची टीम दाखल झाली आहे. बचाव कार्य चालू आहे. ग्रामीण आणि स्थानिक लोकही मदत करीत आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर १० जण बेपत्ता आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभा सचिवालयानं जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडं रवाना झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा