मुंबई : मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या शताब्दीच्या ४० महिला प्रवाशांना ब्रेड बटर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ट्रेन थांबवून प्रवाशांवर उपचार करण्यात आले.
मुंबईहून अहमदाबादला जात होती. सकाळी गाडीत प्रवाशांना ब्रेड बटर सकाळच्या चहा सोबत देण्यात आले होते. प्रवाशांनी हे ब्रेड बटर खाल्ल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागला.
मळमळ, उलटी, अस्वस्थ वाटणे आणि जुलाब होणे यासारखा त्रास सुरू झाला. एकामागून एक प्रवाशांना हा त्रास होत असल्याने एकच खळबळ उडाली.
गाडी सुरतला आल्यानंतर चेन ओढून ट्रेन थांबविण्यात आली. आणि डाक्टरांना बोलावून प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यात आले. काही प्रवाशांना उपचार करून सोडून देण्यात आले.