नाशिक शहरातील सराफ आणि कापड बाजार राहणार बंद

नाशिक, दि.६ मे २०२०: नाशिक शहर रेडझोन मध्ये असले तरीही जिल्हा प्रशासनाने काही ठिकाणी संचारबंदीच्या अटी शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत तसे पत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

दुसरीकडे मात्र शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सराफ बाजार आणि कापड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. जर पेठा सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यातच मंगळवारी ( दि.५) रोजी रात्री उशिरा जिल्ह्यात तब्बल ८१ जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात शहरातील २ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

नाशिक शहराची परिस्थिती मालेगावप्रमाणे होऊ नये, प्रशासनावरचा ताण वाढू नये यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नितीन राजपुरकर यांनी सांगितले आहे.

एकाच रांगेत ५ पेक्षा जास्त दुकाने असल्यास केवळ अत्यावश्यक सेवेला प्राधान्य राहणार असल्याचे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले असल्याने बाजार पेठेतील काही दुकानदारांमध्ये संभ्रम अवस्था आहे.

त्यात मुख्य बाजार पेठ असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, शिवाजी रोड, एम जि रोड, अशोक स्तंभ, भद्रकाली आदी भागात व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था दिसून येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा