राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

3

अमरावती,२९ जुलै २०२३ : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता अखेर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी भिडे हे काल अमरावतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले आहेत. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

वादग्रस्त वक्तव्या वरून संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावतीत काँग्रेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संभाजी भिडे यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. राज्यभरात गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेस आंदोलन करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा