कोरोनाच्या टेस्टमध्ये वाढ करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2022: अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेऊन केंद्र सरकारने सोमवारी त्यांना चाचण्या वाढवण्यास सांगितलं. जेणेकरुन साथीच्या रोगाच्या प्रसारावर प्रभावीपणे लक्ष ठेवता येईल आणि नागरिक-केंद्रित कारवाई त्वरित सुरू करता येईल.

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी त्यांना या पैलूकडं त्वरित लक्ष देण्याचा आणि विशिष्ट भागात केस सकारात्मकतेचा कल लक्षात घेऊन धोरणात्मक पद्धतीने चाचणी वाढवण्याचा सल्ला दिला.

ओमिक्रॉन सध्या देशभर पसरत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. मंत्रालयाच्या पूर्वीच्या पत्रांचा आणि गेल्या वर्षी 27 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनच्या संदर्भात सर्वसमावेशक महामारी व्यवस्थापन फ्रेमवर्क तयार करण्याच्या गृह मंत्रालयाच्या सल्ल्याचा संदर्भ देत, आहुजा म्हणाले की तपासणी करणं हा एक महत्त्वाचा घटक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा