सेंट्रल वॉटर कमिटीचे चेअरमन कुशवेंदर ओहरा यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट

फलटण ६ एप्रिल २०२३: दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सेंट्रल वॉटर कमिशन चे चेअरमन कुशवेंद्र ओहरा यांची भेट घेतली व निरा देवधर धरणाच्या निधीबाबत चर्चा केली लवकरच याला केंद्र शासन निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती कुशवेंद्र ओहरा यांनी दिली.

यावेळी दोघांच्या मध्ये महाराष्ट्रातल्या ५५ दुष्काळी तालुक्याच्या नदी जोड प्रकल्प तसेच दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार करावा अशी सूचना खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली

याबाबत जलसंपदा सदस्यांची बैठक ज्या राज्यामध्ये चांगलं काम सुरू आहे अशा राज्यामध्ये अभ्यास दौरा करून जलसंपदा सदस्य व संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून या प्रश्नावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीमधुन वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी याचा वापर दुष्काळी भागाला कसा करता येईल ही माहिती खासदारांनी दिल्यानंतर कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर ,तसेच मराठवाड्यातील काही दुष्काळी तालुके या भागामध्ये पाणी कशा पद्धतीने नेता येईल यावर केंद्रशासनाने लवकरच समिती घटीत करावी अशी सुचना खासदार निंबाळकर यांनी केली व अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा, तसेच निरा देवघर धरणाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भुमिके बाबत सेंट्रल वॉटर कमिशन चेअरमन कुशवेंद्र ओहरा यांचे खासदार निंबाळकर यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा