दिल्ली, १४ ऑक्टोबर २०२२ : यंदा दिल्लीत छठ पूजा उत्साहात साजरी होणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं. यावेळी ११०० घाटावर छठपूजा होणार असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात ही पूजा होणार आहे. यासाठी केजरीवाल सरकार २५ करोड रुपये खर्च करणार आहे.
यावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, या वर्षी छठपूजा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही पूजा झाली नव्हती. आम्ही सगळे मिळून छठ माँची पूजा करणार तसेच सूर्याचीदेखील पूजा करणार आहोत. त्याच्याकडून आशिर्वादही घेणार आहोत. २०१४ मध्येही पूजा झाली होती. पण त्यावेळी केवळ ६९ ठिकाणी ही पूजा झाली होती. त्यासाठी २.५ करोड एवढा खर्च झाला होता.
दिल्ली पोलिस सर्व प्रकारची सुरक्षेची खबरदारी घेणार असून त्यानुसार ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार असून तंबू तयार केले जाणार आहे. त्याचबरोबर अँब्युलन्स आणि प्राथमिक उपचारांची सोय केली जाणार असल्याचं केजरीवाल यांनी नमूद केलं. दरवर्षीप्रमाणे याही वेळी साऊंड सिस्टिम आणि एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत.
यावेळी छठपूजा मोठ्या प्रमाणावर करायचं असं दिल्ली सरकारने जाहीर केलं. सरकारी अधिका-यांना जादा काम करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत २४ तास वीज असते. पण समजा वीजपुरवठा खंडित झाला तर तो पूर्ववत करण्यासाठी बॅकअपची सोय केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा दिल्लीत जोरदार छठपूजा होणार हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस