छत्रपती संभाजी महाराज जयंती

१४ मे १६५७ जेष्ठ शुध्द द्वादशी, गुरुवार, संवत्सर शके १५७९ छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित साईंबाई राणीसाहेब यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजी होते. त्यांची हत्या अफजलखानाने दगाबजीने केली होती. त्यांचा नावावरून यांना संभाजी नाव दिले गेले.

शंभूराजांना त्यांच्या अयुषाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्याना अवघे ८ वर्षे लाभले (राज्याभिषेक १६. ०१. १६८१ व मृत्यु ११. ०३. १६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमाने अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचे, त्यागाचे, बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओळखले जातात. जगाचा इतिहासात अशी नोंद आहे की शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांचा अयुषात जेवढया लढाया केल्या त्या सर्वात त्यानी विजय मिळविला होता. अपल्या छोट्याशा कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीज , डच, व इतर अनेक अशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केले होते. सर्वानी शंभू राजांच्या पराक्रमापुढे हात टेकले होते.

छत्रपति संभाजी,
एक ज्वलंत व्यक्तिमत्व,
शिवरायांचा छावा,
थोरले छत्रपति,
सईबाई आणि जिजाऊंच्या काळजाचा तुकडा..!
येसूबाई, दुर्गाबाईंच्या
कपाळी चमकणारा
महातेजस्वी भास्कर,
ज्याला आपल्या ओंजळीत घेताना मृत्यु सुद्धा हळहळला असेल, प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतील,
आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान
देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा…..
अशा महापराक्रमी परमप्रतापी
योध्या चरणी शतशः नमन.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा