गोल पोस्ट इतर शुभेच्छा छत्रपती संभाजीराजे जयंती

छत्रपती संभाजीराजे जयंती

१४ मे १६५७ जेष्ठ शुध्द द्वादशी, गुरुवार,संवत्सर शके १५७९

छत्रपती संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित साईंबाई राणीसाहेब यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी होतं त्यांची हत्या अफजलखानानं दगाबजिनं केलि होती. त्यांच्या नावावरून याना संभाजी नाव दिलं गेलं.

राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचं निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होतं. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचं नाव आहे ‘केदारेश्वर’ तर दुसर्‍या टेकडीचं नाव आहे ‘राजगादी’. ‘राजगादी’ हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता. या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.

शंभूराजाना त्यांच्या अयुशाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्यांना अवघे ८ वर्षे लाभलं (राज्याभिषेक १६/०१/१६८१ व मृत्यु ११/ ०३/१६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमानं अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचं, त्यागाचं, बलिदानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओलखले जातात. जगाच्या इतिहासात अशी नोद आहे की, शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांच्या अयुशात जेवढ्या लढाया केल्या त्यासर्वात त्यानी विजय मीळावला होता. अपल्या छोट्याश्या कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीच, डच व इतर अनेक आशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केलं होतं. सर्वानी शंभू राजांच्या पराक्रमापुढं हात टेकले होते.

अशा महापराक्रमी परमप्रतापी योध्या चरनी शतशः नमन.

error: Content is protected !!
Exit mobile version