पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : सध्या वातावरणातले बदल आपण अनुभवतो आहोतच, पण त्याचबरोबर आपण अनेक आजारही अनुभवत आहोत. परतीचा पाऊस हा पावसाळ्यापेक्षा अधिक ताकदीचा होता. तर एकीकडे एका रात्रीत पाऊस जाऊन थंडी सुरु झाली. पूर्वी वर्षाचे विभाजन हे तीन ऋतूत केले जात होते. पण आता तेच वातावरण विविध प्रकारांनी बदललेले असल्याचे सांगितले जाते. याच वातावरणाचा परिणाम ग्लेशिअरवर होत असून त्यामुळे आता बर्फ वितळण्याची क्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.
वास्तविक बर्फामध्ये काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ते बॅक्टेरिया बर्फ वितळल्यामुळे अँक्टीव्ह होऊ शकतात. ज्यामुळे जास्त प्रमाणात आजार पसरण्याची शक्यता असते. असे, प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी यांच्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
या संदर्भात आर्टिक तलावात काही महत्त्वाचे नमुने घेतले गेले. त्यात कॅनडामध्ये हेजन या तळ्यातील नमुने घेण्यात आले. त्यानुसार जसा बर्फ वितळेल, तसे त्यातील किटाणू हे लोकांना संक्रमित करतील. अशी संभावना शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता वातावरणातील बदल आजारांना निमंत्रण देऊ शकतो, हे तितकंच खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस