मा. मुख्यमंत्रीजी साहेब, फेसबूक लाईव्ह मधून थोडेबाहेर या !

मा. मुख्यमंत्रीसाहेब आपण गेल्या ६ महिन्यापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण जरी निवडणुकीला सामोरे गेला नसलात तरी आपण योग्य ते राजकीय कौशल्य दाखविले व जनतेच्या मनात नसताना सुद्धा आपण मुख्यमंत्री झालात ही चांगली गोष्ट आहे. पण अशा भयानक परिस्थिती मध्ये नेहमीच लोकांना मार्गदर्शन करत आहात धीर देत आहात सांत्वन करत आहात फेसबुक लाईव्ह वरून ही फार मोठी आनंदाची व कौतुकाची बाब आहे.

पण प्रत्येक वेळी आपल्या फेसबुक लाईव मध्ये आपण एक शब्द २/३ वेळा तोच तोच उच्चार करता त्यामुळे तुमच्या कडे मराठी शब्दांचे भांडार आहे का नाही याबद्दल शंका उपस्थित होते. आणि दहा मिनिटात व्हायला पाहिजे ते भाषण लांबवले जाते त्यामुळे लोकांना पण आता कंटाळा आलाय फेसबुक लाईव्हचा.

आपणाकडे दिग्गज नेते असताना ते कधी समोर येताना दिसत नाहीत. वास्तविक आपण मुख्यमंत्री आहात त्यामुळे सहाजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण कोरोना सारख्या भयानक माहामारी मध्ये योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज रुग्णांची संख्या १ लाखावर गेली याला जबाबदार कोण ?

साठ साल के बुढे या साठ साल के जवान ?

या वयात पण पवार साहेबांनेच बाहेर पडले पाहिजे का?

वास्तविक तुम्ही लहान मुलांना आणि वृद्धांना बाहेर पडू नका असे म्हणतात. पण तुम्ही स्वतः घरात राहता , परंतू वयोवृद्ध अशा ८० वर्षाचे वडीलधारे व्यक्तीमत्व शरद पवार साहेब मात्र लोकसेवा हेच आपले कर्तव्य म्हणून निसर्ग वादळाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडतात हे कितपत योग्य आहे?

आपल्याकडे असंख्य दिग्गज नेते असताना आपण फक्त आपल्या चिरंजीवांनाच महत्त्व देत देत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे , या नाराजीचा फायदा विरोधी पक्षाने घेवू नये म्हणजे झाले . पण आपणाला बोलून कोणी दाखवत नाही ही फार मोठी खंत आहे .

वास्तविक पाहता जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणे पाहणी दौरा करणे फार महत्त्वाचे आहे. पण आपण तर फेसबूक शिवाय बाहेरच दिसत नाही. त्यामुळे एकच सांगावेसे वाटते अजूनही वेळ गेलेली नाही. आपण फेसबुक मधून थोडेसे बाहेर या कारण फेसबुकवरून सरकार चालत नसते लोकांचे मनोरंजन होते. बाकी आपणाला सर्व माहीतच आहे आपण जाणकार आहात. पांडूरंग आपणास सद्बुद्धी देवो आणि महाराष्ट्र लवकरच पूर्ण कोरोना मुक्त होवो हीच सदिच्छा !

हेमंत निंबर्गी सर
सोलापूर .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा