सोशल मीडिया काळाची गरज

जगाची लोकसंख्या ७९० कोटी आहे. त्यापैकी जवळपास ३०० कोटी लोक फेसबुक वापरतात. १४० कोटी लोक इंस्टाग्राम वापरतात तर १३० कोटी लोक व्हाट्सएप. फेसबुक हे जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट आहे. एवढी की ते एकप्रकारचे ब्राउझर देखील झाले आहे. तसेच एक मोठे व्यावसायिक हब म्हणून फेसबुक खूप महाकाय बनले आहे.

काल साधारण ६ तास फेसबुक, व्हाट्सएप आणि इन्स्टाग्राम बंद झाले तर अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आपण ज्याला एकेकाळी व्हर्च्युअल जग म्हणत होतो त्याने सर्व गोष्टींवर एवढा प्रभाव पाडला ही गोष्ट साधी न्हवे. दिवसाला करोडो रुपये कमावणाऱ्या पासून ते मोलमजुरीवर काम करणारी माणसे देखील याचा वापर करतात.

सर्वात महत्वाचे इथे वापर कोणी करावा यावर बंधने नाहीत. तुम्ही कोण आहात ? याच कोणाला काहीही घेणं देणं नसतं. मला जातीवाद, धर्मवाद यापेक्षा इथला भांडवलवाद जास्त आवडतो. इथे माणसाच्या जातीला, धर्माला किंमत नसते. तर त्याच्या कामाला आणि त्यापासून एकमेकांना होणारे आर्थिक फायदे एवढेच निकष पाहिले जातात. It’s all about business..

एवढं मोठं सोशल मीडिया नेटवर्क उभं करणं ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. त्यासाठी मार्क झुकेरबर्गचे करावे तेवढे कौतुक कमीच आणि त्याहून अधिक इंटरनेटचा शोध लावणाऱ्या सर्वांचे देखील बरेच धन्यवाद मानावे लागतील. समजलं तर ठीक…

– पैगंबर शेख.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा