सीएनजी वाहनधारकांची लूट करणाऱ्या काही खासगी हायड्रो टेस्टिंग वितरकांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मनमानी पद्धतीने दरात अचानक वाढ करून, बिलाशिवाय आणि जीएसटी न भरता ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या वितरकांना केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने (GST) नोटीस बजावली आहे.
‘आझाद रिक्षा संघटनेने’ केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ ७०० रुपयांत होणारी हायड्रो टेस्टिंग अचानक २,८०० रुपयांवर पोहोचली होती, ज्यामुळे वाहनधारकांचा खिसा रिकामा होत होता. अनेकदा टेस्टिंग न करताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. जीएसटी विभागाने वितरकांकडून परवाने, वाहनांची संख्या आणि व्यवहारांचा तपशील मागवला आहे. त्यामुळे, वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले













































