शासनानेच थकवले इमारतीचे भाडे आणि इलेक्ट्रिक बिल

नागपूर १ मार्च २०२४ : नागपुरातील आशीर्वाद नगर येथील येथील कमलाकर शामरावजी उतखेडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री उतखेडे यांनी त्यांच्या मालकीची इमारत नऊ वर्षांपूर्वी सरकारला शासकीय वस्तीगृहाकरिता भाड्याने दिली होती. ही इमारत जुलै २०२३ ला त्यांना शासनाकडून परत करण्यात आली. तेव्हा पासून त्यांच्याकडे आधीचे प्रलंबित भाडे व इलेक्ट्रिक बिल बाकी आहे. यावर कित्येकदा निवेदन दिली परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले.

कमलाकर आणि त्यांची पत्नीने आज पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे थकीत भाड्यासाठी १३ स्मरणपत्र दिली, परंतु त्याचे काही उत्तरं आले नाही. ते स्वतः वीस ते पंचवीस वेळा कार्यालयामध्ये भाड्याकरिता गेले असता कार्यालयातून त्यांना उडवा उडवीचे उत्तर मिळाले. कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. शासनाकडे २३ लाख ५९ हजार रुपये भाडे आणि इलेक्ट्रिक बिल ६१ हजार रुपये बाकी आहे. अशी माहिती या पीडित दाम्पत्याने पत्रकार परिषदेत दिलीय.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूरच्या सुकेशिनी तेलगोटे यांना तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना १९ जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठविले असून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रलंबित इमारतीचे भाडे व थकित इलेक्ट्रिक बिल मिळाले नसल्या कारणास्तव आम्ही चिंतेत पडलो असून बिल भरणा न केल्यामुळे इलेक्ट्रिक बोर्ड आमची लाईन कधीही खंडित करू शकते, अशी माहिती यावेळी उतखेडे दांपत्यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा