नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२२ : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यांनंतर सीएनजीचे दर पुन्हा वाढले आहेत. यावेळी ९५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात ९५ पैशांनी वाढ झाल्याने आता सीएनजी ७९.५६ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे. नवे दर आज (१७ डिसेंबर) सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत.
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचे दर ८२.१२ रुपये प्रतिकिलो, गुरुग्राममध्ये ८७.८९ रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सीएनजी च्या किंमती मध्ये आठ रुपयांचा फरक आहे.
सीएनजी १२ तासांत दोनदा महागला शुक्रवारपर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजी ७८.६१ रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. सीएनजीच्या दरात शेवटचा बदल ८ ऑक्टोबर रोजी झाला होता. गेल्या वेळी ८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो ३ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत सीएनजीची किंमत ७८.६१ रुपये प्रति किलो झाली होती.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने ८ ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात ३ रुपयांनी, त्याआधी २१ मे रोजी २ रुपयांनी, त्यापूर्वी १५ मे आणि गेल्या १४ एप्रिल रोजी सीएनजी दरात वाढ केली होती. १४ एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात किलोमागे २.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.