बारामती, दि. १८ मे २०२०: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ उडवला आहे. या व्हायरसशी दोन हात करताना रुग्णांवर उपचार करणे मोठे जिकरीचे झाले आहे. अशातच ग्रामीण भागात आढळणाऱ्या पेशंटला उपचारासाठी शहरात घेऊन जावे लागत असल्याने रुग्ण संख्या वाढण्याचा धोका ही वाढत आहे.
यावर उपाय म्हणून महाराष्ट्राचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील कोरोना रुग्ण तपासणीची पहिली प्रयोगशाळा आणि आय सी यु सेवा देणार हॉस्पिटल बारामती मध्ये तयार झाले आहे. बारामतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रयोग शाळा आणि रुई ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला असून, या विभागामध्ये ८ बेड उपलब्ध झाले आहेत. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी आणि उपचार हे आता बारामतीत होणार आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या धर्तीवर शासकीय महाविद्यालयाचे काम झाले होते, यातच आता केंद्र सरकारने कोविड १९ तपासणी शाळेला हिरवा कंदील दिल्याने ही बाब बारामतीकरांच्या व बारामती शेजारील तालुक्यांच्या रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव