बारामती, ९ ऑक्टोबर २०२०: बारामती नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या रुई गावात नगर पालिकेच्या सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने गावातील वीजपुरवठा हा अंडरग्राउंड करण्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून विकास कामांचा धडाका सुरू आहे. काल शुक्रवार दि. ८ रोजी रुई गावठाण येथील अंडरग्राऊंड वीजपुरवठा करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर, मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रकांत पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे हे यावेळी उपस्थित होते.
रुई गावातील वीज वाहक तारा खाली आल्याने याचा ग्रामस्थांना सततचा त्रास होता. त्यात रुई गाव पालिका हद्दीत आल्याने येथे बारामती शहराप्रमाणे अंडरग्राऊंड वीज वाहिन्या करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा त्रास होणार नाही तसेच महावितरणकडुन सुरळीत व अखंडपणे वीजपुरवठा सुरू राहील असे येथील नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सांगितले. रुई गाव हे एमआयडीसीच्या जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वसली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव













































