पुणे १९ सप्टेंबर २०२२ : सध्या आयटी कंपनीमध्ये मूनलाइटनिंग नावाचा प्रकार चर्चेत ये. कंपनीच्या सीईओ पासून ते अगदी सामान्य कर्मचारी सर्वच मूनलायटिंग ची चर्चा करतायेत. तर मग आजच्या न्यूज अनकट च्या एक्सप्लेनर मध्ये पाहूया मून लाईटनिंग नेमकं काय आहे
इन्फोसिस कंपनीने एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवला त्या ई-मेलमध्ये म्हटले ये की, जर ते मूनलाइटींग करत असतील तर त्यांची कंपनीतून हाकालपट्टी केली जाईल.
आता मूनलाईटनिंग म्हणजेच डबल नोकरी करणे.म्हणजे तुमचा जॉब समजा १० ते ६ आहे आणि तो तुम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर तुम्ही इतर वेळेस दुसऱ्या कंपनीचे काम करत असाल किंवा दुसरी नोकरी करत असाल तर त्यालाच मूनलाइटनिंग म्हटलं जातं आता उदाहरणासह सांगायचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये शाळेतले शिक्षक हे शाळेतही शिकवता आणि घरी क्लास ही घेतात हे पण एक प्रकारचं मूनलाइटिंग झालं.
मूनलायटिंग ही संकल्पना या आधीच प्रचलित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अनेकजण मूनलायटिंगचा वापर अतिरिक्त कमाईसाठी करतात.Wipro कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे चीटिंग आहे. अशा प्रकारची पॉलिसी म्हणजे कंपन्यांची शुद्ध फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
न्युज अनकट प्रतिनिधी