इंदापूर तालुक्यातील खड्डे बुजवणावरून काँग्रेस आक्रमक

5

इंदापूर, ४ नोव्हेंबर २०२०: अतवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते व त्या वरील पडलेले भले मोठे खड्डे तातडीने बुजावण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आज दिसली. अर्धा तास झालेली चर्चा या मध्ये इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत आणि त्यांचे शिष्टमंडळ यांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांची झालेली दुरावस्था याची सविस्तर माहिती व त्यातून झालेले अपघात या वर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तालुक्यात दोन गंभीर अपघात एक निमगाव केतकी व दुसरा राजवडी पुलावर झालेला आहे. तसेच तालुक्यात छोटे मोठे अपघात रोज चालू आहेत याची गंभीर नोंद pwd च्या अधिकाऱ्यांनी घेऊन किमान रस्त्यावर पडलेले खड्डे युद्ध पातळीवर बुजवून घ्यावेत अशी मागणी आज इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केले. तसे लेखी निवेदन त्यांनी कार्यालयाला दिले व माहितीसाठी प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे याना दिली आहे.

विशेष म्हणजे pwd च्या ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर भाला मोठा खड्डा पडला आहे. तो आधी बुजवा अन्यथा तो आम्ही बुजवुन आंदोलन छेडु असे स्वप्नील सावंत यांनी सांगितलं

या वेळी श्री स्वप्निलजी सावंत अध्यक्ष इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटी यांच्या सहित तानाजी भोंग अध्यक्ष इंदापूर शहर काँग्रेस कमिटी, बिभीषण लोखंडे वरिष्ठ उपाध्यक्ष तालुका काँग्रेस,निवास शेळके सरचिटणीस तालुका काँग्रेस, भगवान पासगे खजिनदार, संतोष शेंडे सरचिटणीस तालुका काँग्रेस, अरुण राऊत युवक सरचिटणीस ,मिलिंद साबळे तालूका युवक सरचिटणीस, सुरेश लोखंडे सरचिटणीस शहर काँग्रेस, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा