काँग्रेसकडून आज राज्यव्यापी निषेध आंदोलन होणार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भाजपावर टीका होऊ लागली आहे. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं असून, दिल्ली भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर त्यावरून संतप्त टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने समाजातून या कृत्याचा प्रखर्षणे विरोध केला गेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेवरुन भाजपवर शरसंधान केलं होतं.

याच बरोबर काँग्रेस मधील नेत्यांकडून ही या प्रकारावर टीका करण्यात आली आहे. या बरोबरच या सर्व प्रकारावरून आज काँग्रेस कडून सर्व ठिकाणी निषेध करण्यात येणार आहे. हे आंदोलन जिल्हा आणि तालुका स्तरावर करण्यात येणार आहे. याच बरोबर मुंबई मध्ये टिळक भवन आणि दादर येथे काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलन करणार आहे. हे पुस्तक मागे घेण्यात यावे आणि माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा