गोल पोस्ट आरोग्य कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोनामुळे मृत्यू

कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई, दि. २३ मे २०२०: राज्यात कोरोना व्हायरसचा आकडा विक्रमी पातळीवर जात आहे. या संकटाच्या विरोधात वैद्यकीय कर्मचा-यांबरोबरच पोलीस प्रशासन देखील तितकेच मोलाचे योगदान देत आहे. या संकटाचा सामना करताना पोलिस कर्मचारी देखील या वायरसला बळी पडत आहेत. राज्यात आत्तापर्यंत १८ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला होता. त्यात आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याची भर पडली आहे.

ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध लढताना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलीस ट्विटर अकाऊंट वरून त्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. याप्रसंगी पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १६०० पेक्षा अधिक आहे. काल पोलिस खात्याकडून दिलेल्या महितीनुसार, ४८ तासात २७८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान मुंबई पोलिस खात्यातील कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ६० लाखाची मदत केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version