केडीएमसीत पुन्हा वाढला कोरोनाचा संसर्ग

8

डोंबिवली, १२ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी धारावी पॅटर्न राबवला गेला. यामुळे कल्याण डोंबिवलीत रूग्णंसख्या काही प्रमाणत कमी झाली होती. रूग्णसंख्या वाढीचा दर सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा या संख्येत वाढ झाली आहे.

कल्याण पश्चिम या परिसरात रूग्णंसख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे मात्र, आता डोंबिवली पूर्व परिसरात सुद्धा ही दिसू लागली आहे. पूर्वेतील फडके रस्ता, नेहरू रस्ता, सारस्वत वसाहत, पेंडसेनगर, रामनगर, राजाजी रस्ता, शिव मार्केट, मानपाडा, सावरकर रस्ता आणि टिळकनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठया संख्येने रुग्ण सापडत आहेत. या भागात नियमित भरणारे बाजार तसेच वर्दळीची केंद्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

हि ठिकाणं स्टेशन परिसरात असल्याने लोकांची वरदळ मोठ्या प्रमाणात सूरू असते, त्यामुळे संसर्ग वाढून रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर बाजार, रिक्षा, बस, फेरीवाले, भाजी खरेदी करताना, ये-जा करताना लोकांशी संपर्क आल्याने काही लोक करोनाने बाधित झालेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने केले आहेत. त्यामुळे हा वाढता आकडा नियंत्रणात येणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा जर रूग्णसंख्या वाढली, तर कडक नियम करणे गरजेचे आहे. जूलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही २०० ते ३५० च्या घरात आहे, त्यामुळे ही संख्या आटोक्यात येणं महत्वाचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे