त्या २१ नागरिकांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

पुरंदर दि. ५ मे २०२० : पुण्याहून आलेला पाहुणा कोरोना पाॅजिटीव्ह निघाल्याने त्याच्या संपर्कातील पुरंदरमधील २१ लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व लोकांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने पुरंदर मधील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पुण्यातील हडपसर येथे रहाणारा एक तरूण दि.२७.४.२०२० रोजी तोंडल येथे सास-यांसाठी औषधे घेउन आला होता. त्याने तोंडल येथे दोन दिवस मुक्काम केला. हडपसर येथील त्याचे मित्र कोरोना पाॅजिटीव्ह निघाल्याने प्रशासनाने त्याचा शोध घेऊन तपासणी केली असता तो कोविड १९ पाॅजिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींना आरोग्य विभागाने सासवड येथे विलगीकरण कक्षात ठेवले होते. सोमवारी(दि.४)रोजी त्यांचे

स्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला असून आणखी सात दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. हा अहवालही निगेटीव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येईल असे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सनोबत यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा