बीजिंग, २९ नोव्हेंबर २०२०: १७ नोव्हेंबर २०१९ हा जगाच्या दृष्टीने इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणने वावगे ठरणार नाही. कारण याच दिवशी जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणुची बाधा झालेल्या पहिला रूग्ण हा चीनच्या वुहान मधे आढळला आणि नाही नाही म्हणता जगात या विषाणुने सर्वात वाईट परिस्थिती निर्माण केली.
संपूर्ण जगाने या विषाणुसाठी चीन कडे बोट दाखवले.तर चीनच्या संशोधकांनी एक थोतांड विधान केले आहे. ज्यामधे थेट भारतामध्ये कोरोनाचा उगम झाल्याचे सांगितले. चीनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना भारतातूनच पसरलाचा आरोप केला आहे.
भारतात २०१९ च्या उन्हाळ्यात कोरोनाचा जन्म झाला, नंतर जणांवराद्वारे माणसांमधे आला. मग कोरोना वुहानला आला, असे वैज्ञानिकाने म्हटलं. मात्र, ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापिठाच्या संशोधकांनी चीनचे हे संशोधन खूपच सदोष असल्याचे सांगत सर्व आरोप खोडले आहेत.
सध्या चीन आणि भारतामधे तसाही तणाव निर्माण आहे आणि चीन नेहमीच अश्या उचापती करतो. कोरोना चा जन्मदाता संपूर्ण जगाला माहित आहे. त्यात आता एका वैज्ञानिकाच्या थोतांड संशोधनामुळे भारताचे नाव घेतले गेले.ज्यामधे कोरोनाचा जन्मदाता सरळ सरळ भारताला सांगण्यात आले.
या उलट चीनने कोरोना विषाणुची माहिती जगासमोर उशिरा सांगितली. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ही या प्रकरणात चीनची बाजू उघडपणे घेताना दिसले. ज्यामुळे आज जगाची किती मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दृश्य समोर आहे आणि त्यात आता हे नविन थोतांड जगासमोर मांडून स्वतालाच तोंडावर पाडले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव