बारामती नगर परिषदेच्या वतीने “बानप केअर्स “ॲपची निर्मिती

बारामती, दि.४ मे २०२०: बारामती नगर परिषदेच्या कोविड-१९ कोरोना जनजागृतीसाठी “बानप केअर्स” हे ॲप सुरू करण्यात आले आहे.
बारामतीच्या नागरिकांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. रविवार (दि.३) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते बारामती नगर परिषदेच्या वतीने कोविड-१९ कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर विकसित करण्यात आलेल्या “बानप केअर्स” या मोबाईल ॲप्लिकेशन चे अनावरण करण्यात आले.

“बानप केअर्स” या ॲपमुळे शहरातली नागरिकांना कोरोना संसर्गाबद्दल असणाऱ्या प्रश्र्नांच्या उत्तराच्या आधारे स्व- चाचणी करता येईल व कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती होण्यास मदत होईल. तसेच ॲपच्या माध्यमातून गरजेच्या ठिकाणचे मोबाईल संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बारामती शहरातील हॉस्पिटल्स तसेच क्वांरन्टाईन सेंटर व आयसोलेशन सेंटर याबद्दलची सविस्तर व सुटसुटीत माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील कोरोना संसर्गा बद्दलचे भितीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल आई योगेश योगेश कडूसकर, मुख्याधिकारी बारामती नगर परिषद यांनी व्यक्त केला. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी गुगल प्ले स्टोअर वरुन अथवा https://play.google.com/store/apps/details?id=com.root.rakshakbnp या लिंकवर वरुन हे ॲप डाउनलोड करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हे ॲप डाटाविव टेक्नॉलॉजीस यांनी विकसित केले असून बेअर प्रयास असोसिएशन यांनी जे अप्लिकेशन नगरपरिषदेस विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा