पुणे, दि. ९ जून २०२०: पुण्यामध्ये औंध हा भाग कोरोना मुक्त म्हणून ओळखला जात होता. परंतू जून महिन्यामध्ये औंध भागांमध्ये कोविड -१९ ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत औंध, बाणेर, बालेवाडी या भागांमध्ये केवळ ६ रुग्ण आढळले होते. मात्र जून महिन्यामध्ये हा आकडा ७८ वर येऊन टेकला आहे.
दरम्यान नुकताच औंध मध्ये पुन्हा एकदा नवीन रुग्ण सापडला आहे. औंध येथील आंबेडकर वसाहती मध्ये हा रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांचे नमुने टेस्टिंगसाठी नेण्यात आले आहेत. या भागातील संख्या विषयी औंध मधील नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आकडा जास्त असण्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली होती. या शंकेचे निवारण करण्यासाठी न्यूज अनकट ने वैद्यकीय अधिकारी जयदीप पवार यांच्याशी संपर्क साधला. यावेळेस त्यांनी आंबेडकर वसाहती मध्ये केवळ एक रुग्ण असल्याचे पुष्टी केली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले.
जून मध्ये संख्येत मोठी वाढ
मे महिन्याच्या अखेरपर्यंत औंध भाग, बाणेर बालेवाडी व बोपोडी या एकत्रित भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होती. परंतू जून महिना सुरू होताच हा आकडा झपाट्याने वाढला. सध्या या भागात (औंध भाग, बाणेर बालेवाडी व बोपोडी या एकत्रित भागात) कोविड -१९ चे ८४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये बोपोडी भागामध्ये जास्त रुग्ण आहेत. औंध बाणेर बालेवाडी या भागांमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत या एकत्रित भागांतून १८ रुग्ण बरे झाले आहेत.
आज पुणे शहरात दिवसभरात १४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मृत्यू १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील हे पॉझिटिव्ह रुग्ण ससून ८, नायडू ६८, खाजगी ६७ अशा रुग्णालयांमध्ये आढळून आले आहेत. शहरात गंभीर रुग्ण १८९ आहेत. तर व्हेंटिलेटरवर ३७ आहेत. शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २४९८ एवढी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे