ग्राहकांनी ए.टी.एम., ऑनलाईन बँकिंगचा वापर करावा: आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा, दि.१७ मे २०२०: कोविड-१९  (कोरोना) या जागतिक महामारीचा प्रगत देशांसह आपल्या देशातही मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. या साथीच्या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकेने जरुर त्या उपाययोजना आखलेल्या आहेत. सातारा जिल्हा बँक ३२०  शाखा व ४७  एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत असून ग्राहकांनी बँकेच्या शाखांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनावश्यक गर्दी करु नये.

भारतीय रिझर्व्ह  बँक, नाबार्ड यांनी डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी जास्तीत जास्त व्यवहार करुन बँक शाखांमधील गर्दी कमी करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. जागतिकीकरण व आधुनिकीकरण यामध्ये स्पर्धात्मक बाबींचा विचार करता ग्राहकांना गुणात्मक व तत्पर सेवा उपलब्ध होणे क्रमप्राप्त झाले आहे.

यामुळे सातारा जिल्हा बँकेनेही ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आरटीजीएस/ एनईएफटी, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅन, एनी व्हेअर बँकिंग, मायक्रो एटीएम, ई-कॉमर्स, भारत बिल पेमेंट सिस्टीम या सारख्या सेवा सुविधा कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून  उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

तरी बँकेच्या ग्राहकांनी जवळच्या शाखेत संपर्क साधून बँकेच्या रुपे डेबिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, किसान एम-पे अ‍ॅप (मोबाईल बँकिंग), ऑनलाईन बँकिंग, भारत बिल पेमेंट सिस्टीम, आरटीजीएस/एनईएफटी इत्यादि सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा