गोल पोस्ट राष्ट्रीय दैनंदिन सरावादरम्यान एक जवान शहीद

दैनंदिन सरावादरम्यान एक जवान शहीद

राजस्थान: राजस्थान मधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज मधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यात असे सांगितले गेले आहे की भारतीय सैन्याच्या दैनंदिन सरावा मध्ये एका टी–९० टँक चे बॅरल फुटून एक जवान शहीद झाला आहे. या घटनेमध्ये शहीद झालेल्या जेवणाचे नाव शाबीर खान असे आहे. त्यांचे वय ३३ वर्षे एवढे होते. या घटनेचा तपास घेण्याचे आदेश देण्यात आले आहे व तपास झाल्यावरच समजेल की ही घटना कोणत्या कारणामुळे घडून आली होती. ज्या टँकचा स्फोट झाला आहे तो टी–९० या टँक चे सुधारित वर्जन टी–९० एम एस आहे. हे या टँकचे सुधारित व प्रगत वर्जन मानले जाते तरीसुद्धा ही दुर्घटना का घडली याचे कारण सांगितले गेले नाही. या आधी २९ ऑगस्टला याच टँकची दुर्घटना झाली होती परंतु त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

error: Content is protected !!
Exit mobile version