दलिया उपमा

51

लहान मुलांना डब्यांमध्ये काय द्यावं हा प्रश्न सर्वच पालकांसमोर असतो. नेहमीच्या भाज्या खाऊन मुलेही वैतागलेली असतात. डब्यामध्ये काहीतरी वेगळं देण्यासाठी हा दलिया उपमा छान पर्याय आहे.

साहित्य: १ वाटी दलिया, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पाव वाटी (गाजर + मटार + फ्लॉवर + सिमला मिरची + फरसबी बारीक चिरून) मूगडाळ पाव वाटी, चवीनुसार मीठ, साखर.
फोडणीसाठी – तूप, मोहोरी, हिंग, हळद , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले, लाल मिरच्या.
कृती: कोरडा दलिया लालसर होईस्तोवर भाजून घ्यावा. तुपाच्या फोडणीत मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता हिरव्या मिरच्या, आले घालावे. ही फोडणी छान बसल्यावर त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्यावा. मग भाज्या परताव्या. त्या थोडय़ा शिजल्यानंतर डाळ घालून हळद घालावी आणि परतावे. सर्वात शेवटी दलिया घालावा. दलियाच्या दोन ते अडीच पट गरम पाणी घालावे. मीठ, साखर घालून मंद आचेवर शिजवावे. हा शिरा अगदी गोळाही होणार नाही आणि अगदी कोरडाही होणार नाही, अशा प्रकारे वाफेवर शिजवून घ्यावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा