पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील तरुणीचं दिवसा ढवळ्या अपहरण

पुरंदर दि.३ ऑक्टोंबर २०२०: देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडत असतानाच आता पुरंदर मधील कोळविहिरे येथील मुलीचं तिच्या भावा समोरच दिवे घटात दिवसा ढवळ्या अपहरण करण्यात आले आहे. याबाबत मुलीच्या भावाने उरुळी देवाची या पोलीस चौकीत मध्ये तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे गावातील दोघे बहिण भाऊ पुण्याहून. कोळविहिरे येथील घरी येत होते दिवेघटात आल्यावर त्यांना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट गाडीतील तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवला व या तरुणीला पळवून नेले. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. दरम्यान मुलीला पळवून नेहणार्‍या पैकी एक जणांची ओळख पटली आहे. अनिश उमर पठाण रा. गंगानागर फुरसुंगी ता. हवेली जिल्हा पुणे असे या संशयिताच नाव आहे.

तर तिला पळवून नेण्यासाठी वापरलेल्या वाहनांचा नंबर हा पोलिसांना मिळाला आहे .स्विफ्ट गाडी MH 12 CY 7056 आणि पल्सर गाडी नंबर MH 12QS 8108 असे या वाहनांचे नंबर असून पोलीस या वाहनांचा व अपहरणकर्त्यांचा कसून शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा