पदवी प्रमाणपत्रांवर कोव्हिडचा शेरा नाही: उदय सामंत

मुंबई, १९ सप्टेंबर २०२०: कोरोनामुळं विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. एवढ्या सगळ्या नंतरही निकाल प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा लावणार असल्याची चर्चा जोर धरायला लागली होती. परंतु असा शेरा विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर कायमस्वरूपी राहील, त्यामुळं विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणी देखील येऊ शकतात. याबाबत आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

९० ते ९२ टक्के विद्यार्थी देतील ऑनलाईन परीक्षा

“अंतिम वर्षातील १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ ९० ते ९२ टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडं झालीय. तर उरलेले १० टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

पदवी प्रमाणपत्रांवर कोव्हिडचा शेरा नाही

“या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोव्हिड १९ असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळं विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये.” असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

“या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा