ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांना २०२३चा पुणे अचिव्हर्स सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते बहाल

पुणे २६ डिसेंबर २०२३ : देशभरातील भारतीय महापुरुष आणि क्रांतिकारांच्या ऐतिहासिक प्रतिमा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटें यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते २०२३चा ‘पुणे अचिव्हर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे त्यांच्या कला शास्त्रातील योगदाना बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी महिला आयोग प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार नितीन शिंदे, राहुल तांबुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली वीस वर्ष सातत्याने आपल्या कला संस्कार कला दालनाच्या माध्यमातून ते शिल्पकला क्षेत्रात आपला नावलौकिक टिकवून आहेत. देशभरातील विविध राज्यात विविध महापुरुषांच्या उंच प्रतिमा बनविण्यात त्यांचा हातखंड मानला जातो. नुकताच महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असा पंचवीस फुटाचा ‘शिव छत्रपती’ पुतळा त्यांनी साकारला असून येत्या १९ फेब्रुवारीला कोकणातील रोहा येथे तो स्थापन करण्यात येणार आहे.

राजदंडाधिष्टित अनोखा शिव पुतळा तसेच शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांचे पिता पुत्र भेट शिल्प असे विविध शिल्पसृष्टी प्रकल्प ही त्यांनी साकारले आहेत. अनेक पुरस्कारांचा सन्मानही महेंद्र थोपटे यांना मिळालेले आहेत. राज्यातील पहिला अत्याधुनिक मार्तंड विजय शिल्प सृष्टी प्रकल्प जयाद्री खोऱ्यात जेजुरी येथे उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजयकुमार हरीश्चंद्रे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा