देशातील सर्वच क्षेत्रातील कामगारांना मिळणार एकाच दिवशी पगार

नवी दिल्ली : शासकीय कर्मचाऱ्यांसह देशातील सर्वच क्षेत्रांतील कामगारांना एकाच दिवशी पगार देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. त्याबाबतचा कायदा तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी (दि.१५) रोजी दिली.

या अगोदर केंद्राने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ चा मुद्दा मांडून त्यावर जनतेची मतेही घेतली आहेत. त्यानंतर आता थेट ‘वन नेशन, वन पे डे’ अर्थात ‘एक देश, एकाच दिवशी पगार’ ही संकल्पना राबविण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.
‘सेंट्रल असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री लिडरशिप समिती २०१९’ या कार्यक्रमात हजर असलेले केंद्रीय मंत्री गंगवार हे बोलत होते.
वास्तविक देशातील सर्वच सेक्टरमधील कामगारांसाठी समान किमान वेतन कार्यक्रम लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्याचा फायदा कामगारांनाच होणार असून त्यांची स्थितीही त्यामुळे सुधारणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा