दिग्विजय सिंग यांनी राफेलची किंमत सांगितली ७४६ रुपये, नंतर मागितली माफी…

10

मध्य प्रदेश, २९ जुलै २०२०: अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राफेल ही लढाऊ विमानं भारतात दाखल झाली. देशभरात राफेलच्या अागमनाची उत्सुकता होती. मात्र आता यावर राजकारणही सुरु झालं आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी सरकारवर टीका करत राफेलच्या किंमती विषयी प्रश्चचिन्ह उभे केले आहे. दिग्विजय यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. मात्र या ट्विटमध्ये एक चूक झाली आणि दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस पक्ष आणि नेते आता ट्रोल होऊ लागले आहेत.

काय म्हणले दिग्विजय सिंह?

”एका राफेलची किंमत काँग्रेस सरकारने ₹ ७४६ ठरवली होती मात्र अनेकदा विचारणा करूनही चौकीदार महोदयांनी एका राफेल विमानाची किंमत सांगितली नाही. कारण त्यांची चोरी पकडली जाईल. चौकीदारजी आता तरी राफेलची किंमत सांगा.”
अशा प्रकारचं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केलं. मात्र यात एक चूक झाली. त्यांनी राफेलची किंमत ही चुकून ₹ ७४६ रुपये इतकी सांगितली. आणि याच चुकीमुळे ते आता ट्रोल होतायत. हे ट्विट केल्याच्या बऱ्याच वेळानंतर त्यांना त्यांची चुक लक्षात आली आणि त्यांनी माफी मागत ती चूक दुरुस्त केली. आणि राफेलच्या एका विमानाची किंमत ७४६ रुपये नसून ती ७४६ करोड इतकी ठरवली होती. असं ते म्हणाले. मात्र तोपर्यत बराच उशीर झाला होता आणि अनेकांनी त्यांचावर टीका केली आहे.

राफेल विमानांच्या खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर हल्ला केला  होता. त्यामुळे राफेल प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र आता सरकारने फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली असून या विमानांची पहिली खेप आज भारतात पोहोचली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा