मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप-शिंदे गटात असंतोष उफाळणार

भिवंडी, ३० जानेवारी २०२३ : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात आहे. यासंदर्भात बोलताना ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले. सरकार स्थापन होऊन सात महिने उलटले; मात्र अधाप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या कालावधीनंतर देखील १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होऊ शकत नाहीत.

भाजपमधले अनेक आमदार, तर शिंदे गटातले सर्व आमदार मंत्रिमंडाळात यायला इच्छुक आहेत व यामुळे कुणाला मंत्रिमंडळात घ्यावे हा पेच असल्याने विस्तार होत नाही, असा गौप्यस्फोट करून एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली आहे. कल्याणमध्ये आयोजित केलेल्या लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमासाठी खडसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सी सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी हा सर्व्हे सत्यपरिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सरकार अस्थिर आहे. सरकार नावाला चालले असून, या सरकारमध्ये समन्वय नाही. मुळात राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करीत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा