पुणे , ९ मार्च २०२१ : ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ आणि ‘ओमा फाउंडेशन’ यांच्या वतीने सातत्याने समाजातील गरजूंना तसेच अनेक संस्थांना वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. आपल्या औद्योगिक उद्दिष्टं बरोबरच समाजाविषयी असलेले आपले कर्तव्य बजावण्यात ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ आणि ‘ओमा फाउंडेशन’ नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. येत्या २७ मार्च रोजी कंपनी आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करत आहे. यानिमित्ताने कंपनीने राज्यातील विविध ठिकाणावरील ग्रामीण शाळांमध्ये ई-लर्निंग बाबत साधने भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोरोना मुळे सर्व शिक्षण संस्था बंद आहे. त्याला पर्याय म्हणून शासनाने ई-लर्निंग च्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले आहे. मात्र ही सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल किंवा प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचली आहेच असे नाही. ही समस्या लक्षात ठेवून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि ओमा फाउंडेशन यांनी दहा ग्रामीण शाळांना ई-लर्निंग विषयी साधन सामग्री मोफत पुरवण्याचे ठरवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे