‘बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’तर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कारांचे उद्या औरंगाबाद येथे वितरण

औरंगाबाद, २८ जानेवारी २०२३ : औरंगाबाद येथील ‘बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘जीवन गौरव पुरस्कारा’चा वितरण सोहळा रविवारी (ता. २९) होणार आहे. या पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीराम पानझाडे (उपसंचालक, प्रशासन शिक्षण आयुक्तालय, पुणे), अनिल साबळे (शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद), धीरज खिरोडकर (उपसंचालक, आरोग्य आणि सुरक्षा,औरंगाबाद), एम. के. देशमुख (माध्यमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद), मुकुंदजी चिलवंत (जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद), श्रीमती जयश्री चव्हाण (प्राथमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद), प्राचार्या डॉ. रेखा शेळके (एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद), आत्माराम बोराडे, डॉ. प्रवीण चाबुकस्वार, सुभाष महेर, शेख सिराज सुजाउद्दीन (इनामदार) यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे विशेष आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

‘बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’च्या निवड समितीने यापूर्वीच ‘राज्यस्तरीय सामाजिक जीवन गौरव पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार,’ जाहीर केले आहेत. समितीने निवडलेल्या सर्व पुरस्कारर्थी बंधू-भगिनींना ‘राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच या कार्यक्रमात शाहीर अजिंक्य लिंगायत प्रस्तुत ‘जागर शाहिरीचा’ कार्यक्रम होणार आहे, असे संस्थेच्या सचिव मीरा वाघमारे, जीवन वाघमारे यांनी कळविले आहे. हा कार्यक्रम एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा