भोकरदन, १२ मार्च २०२४ : केंद्र शासनाच्या ADIP योजने अंतर्गत भोकरदन तालुक्यातील दिव्यांग लाभार्थीचे शिबीर माहे जुलै २०२३ मध्ये आयोजित करुन त्या शिबीरात दिव्यांग लाभार्थीच्या तज्ञ डॉक्टारकडून तपासणी करुन त्यांना आवश्यक असलेल्या साहित्यांचे मोजमाप करुन ADIP यांना अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने भोकरदन तालुक्यात काल सामाजिक न्याय मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून भोकरदन तालुक्याला दिव्यांग लाभार्थीला पुरविलेल्या साहित्याचे मा. आमदार संतोष दानवे आणि खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळेस केंद्रीय राज्य मंञी रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, दिव्यांगजनी आपले अयुष्य सर्वसामान्य व्यक्तीसारखे जगावे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आणि दिव्यांग सशक्तीकरण करण्यासाठी त्याच्या उपयोगी साहित्य वाटप आज केले जात आहे. आपणासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे विविध योजनेंतर्गत मदत करीत आहे त्याचा लाभ आपण घ्यावा, असे आवाहन यावेळेस केंद्रीय राज्य मंञी रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळेस खालील साहित्य वाटप करण्यात आले.
१. बॅटरी (चांजिंग) सायकल – १४ लाभार्थी
२. ट्रायसायकल – ७५ लाभार्थी.
३. कानाचे श्रवण यंत्र (मशिन) – ११६ लाभार्थी.
४. अंधासाठी ब्रेन केन – २२ लाभार्थी.
५. व्हीलचेअर – ७५ लाभार्थी.
६. छडी – ७५ लाभार्थी.
७. कुबडी -६२ लाभार्थी.
८. एस्बो ब्रेच -१४६ लाभार्थी.
असे एकुण ३८४ दिव्यांग लाभार्थीना साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवाय मा. आमदार संतोष दानवे यांनी दिव्यांगांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील मा. जि. प. सदस्य, मा. सभापती आणि पं. स. सदस्य व पदधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सदर कार्यक्रमासाठी भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम एलिम्को (ADIP) कानपडूचे व्यवस्थापक श्री. गोटे सर तसेच पंचायत समिती भोकरदनचे गटविकास अधिकारी श्री. व्ही. पी. बोडखे त्यांचे अधिनस्थ असलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन तांदुळजे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. गोटे भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम एलिम्को (ADIP) कानपडु यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. व्ही. पी. बोडखे गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांनी केले. याप्रसंगी लाभार्थी सह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे