इंदिरा गांधी महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व़ स्पर्धा संपन्न…

जालना, १२ जानेवारी २०२४ : भारत सरकार व युवा खेल मंत्रालय यांच्या अंतर्गत चालणारे नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे ‘माझा भारत विकसित भारत @२०२४’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व़ स्पर्धा पार पडली.

स्पर्धेत जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सदर विषयावर आपले मत मांडले. ‘आपली जबाबदारी व लोकशाही मधील असणाऱ्या विविध त्रुटी दूर करून समाजाने एक संघ होऊन पुढे गेले तर आपण नक्की २०४७ मध्ये विकसित देशाच्या रांगेत जाऊ’ असेही मत मांडले.

स्पर्धेत प्रथम बक्षीस आदिती सुरंगळीकर, द्वितीय शुभम एकनाथ शिंदे तर तृतीय शिवानी बाळासाहेब सिरसाट यांनी पटकाविले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ. राजेंद्र गायके, प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके, संयोजक डॉ. सोमीनाथ खाडे यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा