थंडीत शरीरातील पाणी कमी करू नका……

11

पुणे, ४ फेब्रुवरी २०२१: राज्यातील वातावरणात सध्या चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील नेहमी दमट वातवरण आसलेल्या मुंबईमधे देखी मागील काही दिवसांपासून पारा पडलेला आहे. आणि महाराष्ट्र सध्या गुलाबी थंडी अनुभवत आहे. पण, याच थंडीत आपण आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.त्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

वजन घटवणे कठिण…..

थंडीच्या दिवसांमध्ये वजन घटवणे अत्यंत कठीण काम आसतं. कारण या ऋतूत आपण खूपच कमी पाणी पितो. त्यामुळे या थंडीत मात्र जास्त पाण्याचे सेवन करा.

थंडीच्या दिवसात देखील आपण त्वचेला आरोग्यदायी आणि चमकदार बनवलं जाऊ शकतं.

रेग्युलर पाणी प्यायलाने शरीर आधिक घाण बाहेर काढते. लघवी साफ होते आणि यंत्रणा आतून स्वच्छ होते.

थंडीच्या दिवसात खूप पाणी पिल्याने शरिरात संक्रमण होत नाही. सोबतच सर्दी खोकला या समस्येपासून सुटका होते.

थंडी मधे आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं महत्वाचे आहे. आणि त्यामधे पाणी हा शरीरासाठी महत्वपुर्ण घटक आहे. पण थंडीत आपण पाण्याचे सेवन फार कमी करतो.ज्यामुळे शरीर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे थंडीत पाणी प्या आणि निरोगी रहा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव