रमजानच्या पवित्र महिन्यात अशी करा सेहरी

4
पुणे, २३ एप्रिल २०२१: जगभरात मुस्लिम बांधवासाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याला सुरवात झाली आहे.हा असा महिना आहे,ज्यामधे मुस्लिम बांधव त्यांच्या धर्माशी अधिक खोलावर जोडले जातात.तसेच ते गरजूंना मदतही करतात.हा महिना मुस्लिम बांधवासाठी पवित्र तर आसतोच बरोबरच हा पुर्ण महिनाभर मुस्लिम बांधव रोजा ठेवतात आणि आज आपण त्याबद्दलच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
रमजान आणि सेहरी……
सूर्योदय होण्यापुर्वी निश्चित केलेल्या वेळी मुस्लिम बांधव सेहरी करतात. त्यांनंतर ते काहीही खात नाहीत. यावर्षी रमजान महिना उन्हाळ्यात आल्यामुळे यामधे अश्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जे शरीराला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील या संदर्भात काही टिप्स आपण वाचणार आहोत.
पाणी प्यावे….
सेहरी करताना पुरेसं पाणी प्या कमीत कमी २ लिटर पाणी सेहरी करताना प्यायलास दिवसभर शरीराला पाण्याची गरज भासणार नाही.
निरोगी आणि  हलके पदार्थ खा…..
सेहरी मधे हलके आणि निरोगी पदार्थाचा समावेश करा.सेहरीमध्ये खूप पदार्थ खाल्यावर दिवसभर आपल्याला ते पुरेसे ठरतील, असे वाटत असेल तर ते चूक आहे.महत्त्वाचे म्हणजे भरपूर फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यास दिवसभर उर्जावान वाटेल.
खजूर महत्वाचे….
रमजानमधे खजूर प्रामुख्याने खाल्ले जातात.खजूरात तांबे सेलेनियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. यात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते आणि त्यामुळे शरीराला उर्जा पुरवण्यास मदत होते.
केळी आणि सफरचंद…..
केळी आणि सफरचंद यामधे मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामधे कॅलरीचे प्रमाण कमी असते. फायबर,व्हिटॅमिन सी आणि विविध अँटीऑक्सिंड्टस अशी पोषक तत्वे यामधे असतात.
खारट, मसालेदार आणि खूप गोड पदार्थ टाळा…..
जर सेहरी मधे कमी तिखट, कमी खारट आणि खूप गोड पदार्थ असतील तर दिवसात तहान लागणार नाही. आशा प्रकारच्या खाद्य पदार्थांमधील सोडियम आपल्या शरीरातील द्रव संतुलित करण्यास मदत करते. जेव्हा आपण जास्त खारट पदार्थांचे सेवन करतो, तेव्हा आपल्या पेशींपासून पाणी काढले जाते. परिणामी तहान लागते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा