तुमची स्मरण शक्ती कमी आहे का? तर वाचा त्याबद्दलचे संशोधन……

पुणे, १२ फेब्रुवरी २०२१: जे लोक नेहमी लवकर वस्तूना विसरतात ते ज्यांची स्मरण शक्ती चांगली असते त्यांच्यावर जळत आसतात. अनेक वेळा आपली स्मरण शक्ती कमी असल्यामुळे आपल्याला लाज वाटू लागते. ज्यांची स्मरण शक्ती कमकुवत असते ते बोलणं देखील कधी कधी विसरून जातात, ज्यामुळे त्यांच्या बरोबर आसण्यार्या लोकांना तो त्रास सहन करावा लागतो. सहज एक विचार करा तुम्ही सर्व मित्र मैत्रिणींचा ग्रुप कुठे फिरायला गेला आणि तुमच्या विसरभोळ्या मित्राने हाॅटेलच बुक नाही केलं तर झाली ना पंचाईत.

आता करणार काय?

आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो जो मित्र हाॅटेल बुक करायला विसरला त्यालाच सांगायचं की आता काहीतरी जुगाड कर म्हणून, यासाठी नाही की तयाची स्मरण शक्ती कमी आहे तो विसरभोळा आहे. तर अशी लोकं सामन्य लोकांपेक्षा जास्त समझदार असतात. असे मित्र अनेकदा मोठ्या अडचणीमध्ये पडलेले असताना सहज बाहेर येतात आणि दुसर्या अडचणीत असलेल्या ही मित्रांना बाहेर काढतात.

आता आमच्या अश्या बोलण्यामुळे तुम्हाला वाटेल आम्ही काय लिहीतोय. पण, हे आमचे मत नसून कॅलिफ़ोर्नियाच्या स्टैनफोर्ड युनवर्सिटी मध्ये झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की, ज्यांची स्मरण शक्ती कमकुवत असते त्यांचा मेंदू सामन्यानपेक्षा जास्त जलद गतीने काम करतो. एकाच वेळी ते अनेक गोष्टींचा विचार करतात. ज्यामुळे ते काही गोष्टी विसरून जातात.

कॅलिफ़ोर्नियाच्या स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये केल्या गेलेल्या या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. पुढे या रिसर्च मध्ये म्हटलं गेलं आहे कि जी लोक जास्त विचार करतात ते आपले काम चांगले करण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे डोकं हे जुन्या गोष्टींना सोडून नव्या विचारांसाठी जागा होते आणि ते जुन्या गोष्टी विसरून जातात.

हा रिसर्च स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी च्या काही विद्यार्थ्यांनी केला आहे.ज्या नंतर तेथील प्रोफेसर माइकल एंडरसन यांनी या रिसर्च वर “विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनमुळे आता ज्यांची स्मरण शक्ती शक्ती कमी आहे, त्यांच्या बद्दल येणाऱ्या काळात सामन्य लोकांचा दृष्टीकोन बदलेल.”असा विश्वास व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा