डोंगरे वस्ती लोणी देवकर रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला….

इंदापूर १७ ऑक्टोबर २०२० : राज्यासह इंदापूर तालुक्यात बुधवारी पावसाने कहर केला. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर काहींची शेतामधील पिकं वाहून गेली.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ते डोंगरे वस्ती हा रस्ता जिल्हा परिषदेमार्फत सहा महिन्यापूर्वीच तब्बल २१ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. मात्र वेळोवेळी रस्ता तयार होत असताना स्थानिकांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार संबंधित विभागाकडे केली होती.

परंतु याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेला संपूर्ण रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने वस्तीवरील रहिवाशांना दळणवळण करता येत नाही. रस्ताच नसल्याने वस्तीवरील लोकांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे प्रशासनाने तातडीने आम्हाला दळणवळणासाठी रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी स्थानिक नेते अर्पण डोंगरे आणि ग्रामस्थांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा