नवी दिल्ली, १७ मे २०२१: कोरोना साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी, रुग्णांना आज (१७ मे) डीआरडीओचे अँटी कोविड औषध, 2 डीजी मिळणे सुरू होईल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यात काल सकाळी साडेदहा वाजता बैठक झाली. या अँटी-कोविड औषधाची पहिली खेप बाजारात आणली जाणार आहे. आज दिल्लीच्या विविध रूग्णालयात सुमारे १०,००० डोस उपलब्ध असतील.
डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) च्या प्रयोगशाळेने ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ (2-डीजी) विरोधी कोविड औषध हैदराबादच्या डॉक्टर रेड्डी लॅब यांच्या संयुक्त विद्यमानं विकसित केलंय. क्लिनिकल चाचणी नंतर, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं नुकतेच आपत्कालीन वापरासाठी ग्रीन सिग्नल दिला.
हे औषध पाण्यात विसर्जित होणार आहे. ते पिशवीमध्ये पावडरच्या स्वरूपात आढळेल. हे पाण्यात विरघळलं जाऊ शकतं आणि रुग्णांना दिलं जाऊ शकतं. असा दावा केला जात आहे की ग्लूकोजच्या आधारे या 2-डीजी औषधाच्या वापरामुळं कोरोना रूग्णांना ऑक्सिजनवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच ते लवकरच बरे होतील. हे विषाणू बाधित पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणू संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून व्हायरसला वाढण्यास थांबवतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे