कोची, १४ मे २०२३: भारतीय नौदलाच्या इंटेलिजन्स युनिट आणि एनसीबीने संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली आहे. नौदल आणि एनसीबीने अरबी समुद्रात २६०० किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार यांची किंमत १२.००० कोटी रुपये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले ड्रग्ज इराणमधून येत होते. गुजरातमधील बंदरात पोहोचण्यापूर्वीच ते जप्त करण्यात आले. २६०० किलो ड्रग्जसह पकडलेल्या माफियाला कोचीच्या बंदरात नेण्यात आले, जिथे एनसीबी आणि नौदल या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. आता या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे, यांचा शोध घेतला जात आहे.
नौदलाच्या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थांची खेप पकडली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली. विशेष म्हणजे सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टिईजी तैनात करण्यात आली होती. दरम्यान सुदानमधील सर्व भारतीयांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर आयएनएस टिईजीने हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर